भुसावळात गुडघ्यांवर मोफत शस्त्रक्रिया शिबिर


रुग्णांनी मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घ्यावा : डॉ.निलेश महाजन यांचे आवाहन

भुसावळ : शहरातील यावल रस्त्यावरील साईपुष्प अ‍ॅक्सीडेंट हॉस्पीटलतर्फे दुर्बिणीद्वारे गुडघ्यांवर मोफत शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तत्पूर्वी 11 ते 20 नोव्हेंबर दरम्यान तपासणी तर 21 व 22 नोव्हेंबरला शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

रुग्णांसाठी सुवर्णसंधी
गुडघ्याला अ‍ॅक्सीडेंट किंवा खेळताना मार लागल्यामुळे सांध्यातील गादी किंवा लिगामेंटला ईजा होते त्याची उपाययोजना दुर्बीणीद्वारे केली जाते मात्र या उपचारांना खर्च अधिक लागत असल्याने रुग्ण उपचारापासून वंचित राहतात मात्र शहरातील साईपुष्प हॉस्पीटलमध्ये अशा रुग्णांसाठी सुवर्णसंधी चालून आली असल्याचे डॉ.निलेश महाजन यांनी कळवले आहे. या शिबिरात ऑपरेशन, भूल, जेवण, औषधी मोफत दिल्या जाणार आहेत शिवाय शस्त्रक्रिया महात्मा ज्योतीबा फुले, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात येणार आहेत. रुग्णांनी येताना जुने रीपोर्ट, रेशन कार्ड, आधारकार्डची झेरॉक्स सोबत आणावी, असे आवाहन डॉ.निलेश महाजन यांनी केले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !