भुसावळातील रेल्वे प्रवाशाचा सचखंड एक्स्प्रेसमधून महागडा मोबाईल लंपास


भुसावळ : प्रवासी शौचालयात गेल्याची संधी साधत चोरट्यांनी त्याच्या बॅगेतील सुमारे 14 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला. ही घटना रविवारी पहाटे दोन वाजता इटारसी-खंडवा दरम्यान सचखंड एक्स्प्रेसमध्ये घडली. याप्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

केरळातील मूळ रहिवासी असलेल्या विवाहितेची दीपनगरात आत्महत्या 

तक्रारदार भुसावळातील रहिवासी
भुसावळ शहरातील सिंधी कॉलनीतील रहिवासी रोहित सुशीलकुमार ललवाणी हे अमृतसर येथून भुसावळ येण्यासाठी सचखंड एक्स्प्रेसच्या एस-1 या डब्यातील 39 क्रमांकाच्या सीटवर बसून प्रवास करत होते. इटारसी ते खंडवादरम्यान ते मोबाइल बॅगेत ठेऊन शौचालयात गेले. परत आल्यावर बॅगेतील मोबाइल चोरीला गेल्याचे उघड झाले. त्यांनी भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

अभियंता मुलाचा अपघाती मृत्यू ; सुनेचा सासु-सासर्‍यांनी केला पुर्नविवाह


कॉपी करू नका.