महामार्गावर रेल्वेच्या सेवानिवृत्त कर्मचार्‍यास लूटले


भुसावळ : तालुक्यातील साकरी येथील रहिवासी व रेल्वेतील सेवानिवृत्त कर्मचार्‍यास चौघांनी जबरदस्तीने लुटल्याची घटना 15 रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील फेकरी टोलनाक्याजवळ घडली. 450 रुपयांच्या रोकडसह एक हजार रुपये किंमतीचा मोबाईल व दुचाकी घेत लुटारूंनी पळ काढला. साकरी येथील रहिवासी व सेवानिवृत्त कर्मचारी यशवंत काशीराम सपकाळे (65) हे शुक्रवार, 15 रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास दुचाकीने साकरी येथे जात असताना राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्याजवळ दुचाकी (एम.एच.19-7703) ला अज्ञात आरोपींनी अडवत धमकावून त्यांच्या खिशातील 450 रुपये रोख, एक मोबाईल व दुचाकी जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच तालुक्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार व सहकार्‍यांनी घटनास्थळी भेट देत टोलनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे लुटारूंचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या गुन्ह्याचा तपास एपीआय रुपाली चव्हाण करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !