देशी विदेशी-दारूची चोरटी विक्री : आरोपीला अटक
जळगाव : अवैधरीत्या देशीविदेशी दारूची विक्री करणार्या संशयीत आरोपीला सुप्रिम कॉलनीतून अटक करण्यात आली असून संशयीताकडून सुमारे 21 हजार 925 रुपयांची दारू जप्त करण्यात आली व एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. विनायक देवेश्वर मेश्राम (सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
दारूची चोरटी विक्री
शहरातील सुप्रीम कॉलनीतील विनायक देवेश्वर मेश्राम हा सुप्रिम कॉलनीतील नाथकृपा कॉम्प्लेक्समध्ये देशी-विदेशी दारूची चोरटी विक्री करत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी ठाण्याचे पोसि निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाल्यानंतर त्यांनी रविवारी कारवाईचे आदेश दिले. आरोपी विनायक देवेश्वर मेश्राम (38, महादेव मंदीराजवळ, सुप्रिम कॉलनी) यास अटक करण्यात आली. पोलिस नाईक सुधीर सावळे यांच्या फिर्यादीवरून संशयीतांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
पोलि निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अमोल मोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, हवालदार योगेश सपकाळे, मिलिंद सोनवणे, सचिन पाटील, सुधीर सावळे, कॉन्स्टेबल सतीश गर्जे यांनी कारवाई केली.
