अवैध वाळू वाहतूक : जळगावात दोन डंपर जप्त
जळगाव : अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्या डंपरवर गेल्या दोन दिवसांपासून पोलिस प्रशासनाकडून धडक कारवाई सुरू असून पुन्हा दोन डंपर जप्त करीत गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात सहा जणांवर दाखल करण्यात आला.
पैशांच्या वादानंतर तांबापुर्यात दोन गटात तुफान दगडफेक : दोघे किरकोळ जखमी
अवैध वाळू वाहतूक ऐरणीवर
शहरातील शिवाजी नगर परीसरात असलेल्या दालफळ रोडवरून अवैधरीत्या वाळूची चोरटी वाहतूक करणारे डंपर (एम.एच.19 झेड.4973) आणि (एम.एच.19 झेड.4427) शहर पोलिसांनी शनिवारी रात्री पकडले. डंपर चालकांकडे वाळू वाहतूकीबाबत कोणतीही परवाना नसल्याने पोलिस कॉन्स्टेबल तेजस मराठे यांच्या फिर्यादीवरून रविवारी 5 जून रोजी सकाळी शहर पोलीस ठाण्यात प्रकाश कडू सोनवणे (30, विदगाव, ता.जि.जळगाव), दीपक उर्फ भिला नामदेव कोळी (28, तानाजी मालसुरे नगर, जळगाव), डंपर मालक पवन सुनील पाथरवट (22), सुनील बारकू पाथरवट (42, दोन्ही रा.साकेगाव, ता.भुसावळ), अनिल हिरामण पवार (साकेगाव, ता.भुसावळ) आणि जयेश कांतीलाल शहा (50, जळगाव नाका, भुसावळ) या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक क्षिरसागर, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी करीत आहे.

भरधाव दुचाकी डिव्हायडरवर धडकली : दोन जण जागीच ठार तर एक जखमी
