सुरवाडेच्या विवाहितेची आत्महत्या : पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा


बोदवड : सासरच्या जाचाला कंटाळून तालुक्यातील सुरवाडे बुद्रुक येथील विवाहिता ट्विंकल हेमंत मिस्तरी (21) हिने राहत्या घरात पेटवून घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणी मयताची आई सुवर्णा विजय दांडगे (38) यांनी बोदवड पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी तथा पती हेमंत गोपाल मिस्तरी, सासरे गोपाल शंकर मिस्तरी, सासू तुळसाबाई गोपाल मिस्तरी, दीर विजय उर्फ उमेश गोपाल मिस्तरी, संजय नामदेव राऊत (सर्व राहणार सुरवाडे बुद्रुक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकी आणण्यासाठी पैसे न आणल्याने छळ
2 जानेवारी 2019 रोजी मयत ट्विंकलचा विवाह मोठ्या थाटात समाजाच्या रीतीरीवाजानुसार झाला मात्र विवाहानंतरच्या दोन महिन्यानंतर मयत विवाहितेचा सासरच्या मंडळींनी लग्नात मानपान दिल्याने छळ सुरू केला तसेच पतीसह दिराला कामावर जाण्यासाठी दुचाकी हवी असल्याने माहेरून 50 हजार रुपये आणावेत म्हणून तसेच लग्नात आंधण न मिळाल्याने आरोपींनी विवाहितेचा छळ चालवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या छळाला कंटाळून विवाहितेने 10 नोव्हेंबर 2019 रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सासरी गॅस शेगडीच्या सहाय्याने पेटवून घेत आत्महत्या केली. तपास उपनिरीक्षक भाईदास मालचे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !