भुसावळात आज आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम

श्री विठ्ठल मंदिरावर रोशनाई : दोन वर्षानंतर भाविकांमध्ये उत्साह


Various programs on the occasion of Ashadi Ekadashi in Bhusawal today भुसावळ : आषाढी एकादशीचे औचित्य साधून शहरातील पुरातन अशा विठ्ठल मंदिरावर आकर्षक रोशनाई करण्यात आली आहे. आषाढीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन रविवारी दिवसभरात करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रमांसह मंदिरांमध्ये कार्यक्रम करता येत नसलेतरी यंदा मात्र कार्यक्रम होणार असल्याने भाविकांमध्ये उत्साह आहे.शहरातील व्हीएम वॅार्डातील विठ्ठल मंदीराला 272 वर्षांची परंपरा आहे.

भुसावळातून श्री विठ्ठल नामाच्या गजरात आषाढी एक्स्प्रेस पंढरपूरकडे रवाना

शहरातील मंदिराला प्राचीन वारसा
शहरातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या विठ्ठल मंदिरात दरवर्षी आषाढी एकादशीला मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्यक्रमांचे दिवसभर आयोजन केले जाते. शहरातील हे जुने मंदीर असून या मंदीरात गेल्या तीन वर्षांपूर्वी ‘पुष्पक विमान’ या मराठी चित्रपटासाठी चित्रीकरण करण्यात आले होते. यावेळी मराठी कलावंत मोहन जोशी आणि अन्य कलाकार येथे आले होते.


आज विविध कार्यक्रम
रविवारी आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे पाच वाजता मंदिरात सालाबादप्रमाणे विठ्ठल रुख्मिणी यांच्या मूर्तीला अभिषेक होईल तसेच आरती होणार आहे. सायंकाळी सुध्दा आरती होणार आहे. एकादशीनिमित्त मंदिरावर रोेषणाई करण्यात आली आहे. एकादशीच्या दिवशी पिंकेथान महिला मंडळातर्फे साबुदाणा फराळ भक्तांना दिला जाणार आहे. द्वादशीला देवासमोर 56 भेाग नैवैद्य दाखविला जाणार आहे. एकादशीनिमित्त मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होतील, असे मंदिराचे चेअरमन सुहास फालक यांनी सांगितले.सायंकाळी नगर प्रदर्शना होईल व दिंडी निघेल. आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते महाआरती होणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !