भुसावळ पालिकेतर्फे 198 दिव्यांगांना मिळणार जयपूर फूट, कॅलीपर

तज्ज्ञ डॉक्टरांकडून शहरात तपासणी शिबिर


Bhusawal Municipality will provide Jaipur Foot, Caliper to 198 persons with disabilities भुसावळ : नगरपालिकेच्या श्री संत गाडगेबाबा रुग्णालयात शनिवारी दिव्यांग निधी वाटप आणि आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात भुसावळ शहर व तालुक्यातील 198 दिव्यांगांची नोंदणी झाली. या दिव्यांगांना जयपूर फूट व प्रास्थेटिक हँड तसेच पोलिओ ग्रस्तांना कॅलीपर दिले जाणार आहे. यासाठी नोंदणी करण्यात आली.

दिव्यांग बांधवांना निधीचे वितरण
दिव्यांग तपासणी शिबिरात अस्थिरोग तज्ज्ञ डॉॅ. नीलेश महाजन, डॉ आशिष रत्नानी, डॉ. चित्तरंजन चौधरी, डॉ किरण झांबरे यांनी तपासणी केली. या शिबिरात दिव्यांगांना निधीचे वितरण करण्यात आले. मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी शासकीय योजनांची माहिती दिली तसेच शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी पालिकेच्या वैैद्यकिय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर, डॉ. संदीप जैन, डॉ.आर्शिया शेख, डॉ.उज्वला भंगाळे, डॉ.नृपाली सावकारे आदींची उपस्थिती होती.


यांची शिबिराला उपस्थिती
क्षयरोग व मलेरिया विभागाचे सुनील महाजन, डी.जे. चोपडे, भानुदास चौधरी, प्रदीप झांबरे, राजेंद्र सुरवाडे, नगरपालिका रुग्णालयाचे प्रकाश तळेले, वैभव पवार, संजय ठाकूर, सागर तायडे, हर्षल जैन, रेखा सोनवणे, वर्षा लोखंडे, योगीता जोगी, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाचे अर्चना चौधरी, प्रशांत कुलकर्णी, अंबादास घायवट, राधा पाटील, सुनीता चित्ते, सुनीता झाल्टे आदींसह सर्व कर्मचारी उपस्थित होते.

उदळीतील ग्रामीण पतसंस्थेला 12 लाखांचा चुना : त्रिकूटाविरोधात गुन्हा 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !