भुसावळातून एकाचवेळी तीन दुचाकी चोरीला
Three bikes were stolen from Bhusawal At The Same Time भुसावळ : शहरात दुचाकी चोरींचे सत्र कायम असून एकाचवेळी तीन दुचाकी चोरीला गेल्याने दुचाकी मालकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे.
दुचाकी धारकांमध्ये पसरली भीती
शहरातील जुना सातारा भागातील कोळीवाड्यातील रहिवासी पवन मिस्तरी यांची दुचाकी मात्र या गाडीचे हॅण्डल लॉकच तुटले नसल्याने चोरट्यांनी या गाडीतील पेट्रोल काढून गाडी रस्त्यातच सोडून दिली तर या भागातील दिनेश गायकवाड यांची सुध्दा दुचाकी (एम.एम.19-0675)लांबवली तर संदीप नामक एका व्यक्तीची सुध्दा मोटरसायकल चोरट्यांनी लांबविली मात्र ही गाडी फिरवल्यानंतर घराजवळ सोडून चोरटे पसार झाले.

अट्टल दुचाकी चोरट्यांचे त्रिकूट भुसावळ शहर पोलिसांच्या जाळ्यात

