Amalner Taluka Gang Who Stole Two-Wheeler In Police Custody दुचाकी चोरी करणारी अमळनेर तालुक्यातील टोळी पोलिसांच्या ताब्यात


Amalner Taluka Gang Who Stole Two-Wheeler In Police Custody अमळनेर : नाशिक येथील सातपूर भागातून कंपनी कामगारांच्या दुचाकी चोरी होत असतानाच अमळनेर पोलिसांनी तालुक्यातील चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. चौघा आरोपींच्या ताब्यातून सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अमोल दशरथ पाटील (23), विशाल अधिकार पाटील (22, दोन्ही, रा.मांडळ) व सुनील पाटील (रा.आनोरे) व मल्हारी रावसाहेब पाटील (रा.चौबारी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अखेर अटक

दुचाकी चोरीचे अमळनेर तालुका कनेक्शन
नाशिक येथील सातपूर भागातून कंपनी कामगारांच्या दुचाकी चोरी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या संदर्भात पोलिसांनी केलेल्या तपासात याचे धागेदोरे हे अमळनेर तालुक्याशी जुडलेले असल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान, पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाला अमोल दशरथ पाटील (23), विशाल अधिकार पाटील (22, दोन्ही, रा.मांडळ) हे दोन विना क्रमांकाच्या दुचाकींवर जाताना आढळल व त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी दुचाकी नाशिक येथून चोरी केल्याची कबुली दिली.

चोरीच्या सहा दुचाकी जप्त
अमळनेर तालुक्यातील दिनेश सुनील पाटील (रा.आनोरे) व मल्हारी रावसाहेब पाटील (रा.चौबारी) यांच्या मदतीने दुचाकी चोरून त्या तालुक्यात विकत होते. या अनुषंगाने या दोघांसह अमोल दशरथ पाटील व विशाल अधिकार पाटील यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून चोरीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या.

परप्रांतीय मोबाईल चोरटे भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात


कॉपी करू नका.