Jalgaon city rocked by murder again जळगाव शहर पुन्हा खुनाने हादरले : जुन्या वादातून तरुणाचा खून


Jalgaon city rocked by murder again : Youth killed due to old dispute जळगाव : शहरात खुनांचे सत्र थांबायला तयार नाही. दोन दिवसांपूर्वी शाहू नगरातील जळकी मिल भागात खुनाची घटना ताजी असतानाच शनिवारी पुन्हा हरीविठ्ठल नगर परीसरात दिनेश काशीनाथ भोई (28, हरीविठ्ठल नगर, जळगाव) या तरुणाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जळगाव गुन्हे शाखेने विठ्ठल माऊली हटकर या तरुणास अटक केली आहे. दरम्यान, खुनानंतर हरीविठ्ठल नगरात मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जळगावात पुन्हा गुन्हेगारीने डोके काढले वर
दोन दिवसांपूर्वी गेंदालाल मिल परीसरात राहणार्‍या तरुणाचा जळकी मिल रेल्वे ट्रॅकजवळ खून करण्यात आला होता व ही घटना विस्मरणात जात नाही तोच शनिवारी पुन्हा खुनाची घटना समोर आल्याने शहरात खळबळ उडाली असून गुन्हेगारी उफाळून आल्याने पोलिसांच्या कार्यपद्धत्तीविषयीदेखील संताप व्यक्त होत आहे.

जुन्या वादातून तरुणाचा खून
शनिवार, 23 रोजी रात्री 8.30 च्या सुमारास हरीविठ्ठल नगर परिसरातील गणपती मंदिर बाजार पट्टा परीसरात लोखंडी रॉडने दिनेश भोई याच्या डोक्यावर आरोपी विठ्ठल हटकर याने वार केले. जखमी अवस्थेत त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता त्याचा उपचार सुरू असताना रात्री 9.30 च्या सुमारास मृत्यू झाला. वैयक्तिक वादातून हा हल्ला झाल्याचे समजते.

संशयीताला अवघ्या काही वेळेत एलसीबीकडून अटक
घटनेची माहिती कळताच एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने धाव घेतली. संशयीत विठ्ठल माऊली हटकर हा एका ठिकाणी लपला असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. एलसीबीचे विजय पाटील, प्रितम पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख यांनी विठ्ठल हटकर यास ताब्यात घेतल्याची माहिती आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात नागरीकांची मोठी गर्दी जमली आहे. वैयक्तिक वाद आणि जुन्या वैमनस्यातून हा खून झाल्याचे समजते.

 

चंद्रकांत पाटलांनी बोलून दाखवली मनातील खदखद : आम्ही मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले


कॉपी करू नका.