Condolences To BJP State President Chandrakant Patil : Saraswati Patil Passes Away भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मातृशोक : सरस्वती पाटील यांचे निधन


Condolences to BJP state president Chandrakant Patil: Saraswati Patil passes away कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री सरस्वती बच्चू पाटील (91) यांचे कोल्हापूर येथे वृद्धापकाळाने निधन झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चंद्रकांतदादा पाटील यांच्या मातोश्रींनी सर्व भावंडांवर स्वाभिमानाने आणि मेहनतीने जगण्याचे संस्कार केले. या संस्कारांच्या शिदोरीवरच चंद्रकांतदादा पाटील आणि त्यांचे सर्व कुटुंब आयुष्यभर वाटचाल करत आहे. दादांच्या मातोश्रीवर रविवार, 24 जुलै रोजी रात्री 8.30 वा कोल्हापूर येथील पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

प्रतिकूल परीस्थितीशी केला संघर्ष
घरची परीस्थिती अतिशय हालाखीची असताना दादांच्या मातोश्री सरस्वती पाटील यांनी अतिशय संघर्षात दिवस काढले. बच्चू पाटील कापड गिरणीत कामाला असताना, पैसे अतिशय कमी मिळत असताना त्यांनी संसाराचा गाडा हाकला. चंद्रकांतदादांना शिक्षण दिलं, संघर्षाची प्रेरणा दिली. माझ्या आयुष्यात, प्रवासात माझ्या आईचा सर्वाधिक वाटा राहिलाय, अशी भावना चंद्रकांतदादा नेहमी बोलून दाखवायचे.

कष्टाला कमी कधीही पडू नकोस
कष्टाला कमी पडू नकोस, आयुष्यात तुला काही कमी पडणार नाही, अशी शिकवण चंद्रकांतदादांना त्यांच्या मातोश्री सरस्वती पाटील यांनी कायम दिली. दादांनीही त्यांनी शिकवण अंगीकारली. कठीण परिस्थितीत संघर्ष करायला शिकवणारी मायमाऊली गेल्याने दादांच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली आहे.


कॉपी करू नका.