Beating Father And Son In Kuwarkheda : Crime Against Quartet कुवारखेड्यात पिता-पूत्रांना मारहाण : चौकडीविरोधात गुन्हा


Beating Father And Son In Kuwarkheda : Crime Against Quartet जळगाव : तालुक्यातील कुवारखेडा येथे पिता-पूत्रास चौघांनी शिवीगाळ करून लोखंडी पाईपाने मारहाण केली. याबाबत रविवारी सायंकाळी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

खिरोद्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण : अज्ञाताविरोधात गुन्हा

पिता-पूत्रास कारण नसताना मारहाण
आधार चावदस सपकाळे (60ग, कुवारखेडा) हे मुलगा राहुल आधार सपकाळे याच्यासह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. शनिवार, 23 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास काहीही कारण नसतांना भरत लालचंद कोळी, त्याचा भाऊ दिलीप लालचंद कोळी, त्याची आई मंगलाबाई लालचंद कोळी आणि त्याची पत्नी देवकाबाई भरत कोळी यांनी शिवीगाळ केली. यात भरत आणि दिलीप हे दोघे दारू पिऊन आले होते. त्यावेळी दोघांनी हातातील लोखंडी पाईपने आधार सपकाळे यांना मारहाण केली. वडीलांना मारहाण होत असल्याचे पाहून राहूल सपकाळे हा धावून आला. त्याला देखील चौघांनी बेदम मारहाण केली.

जळगाव तालुका पोलिसात गुन्हा
या मारहाणीत पिता-पूत्र जखमी झाले. रविवारी सायंकाळी आधार सपकाळे यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून भरत लालचंद कोळी, दिलीप लालचंद कोळी, मंगलाबाई लालचंद कोळी आणि देवकाबाई भरत कोळी (सर्व रा.कुवारखेडा, ता.जि.जळगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करयात आला. पुढील तपास पोलिस नाईक सुशील पाटील करीत आहे.

हॉर्न वाजवल्याचे निमित्त : कंडारीत दुध विक्रेत्याला त्रिकूटाकडून मारहाण


कॉपी करू नका.