Suicide of 18-year-old Girl in Bhusawal भुसावळातील 18 वर्षीय युवतीची आत्महत्या
Suicide of 18-year-old Girl in Bhusawal भुसावळ : येथून जवळच असलेल्या कंडारी ग्राम पंचायतीच्या क्षेत्रातील गोलाणी परिसरातील रहिवासी असलेल्या 18 वर्षीय युवततीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारी एक वाजता उघडकीस आली. निकीता नंदू कोळी (18) असे मयताचे नाव आहे. ती कंडारी ग्रामपंचायतीच्या सदस्य शारदा नंदू कोळी यांची कन्या आहे.
बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
गोलाणी परीसरात राहात असलेली निकीता कोळी या युवतीने दुपारी घरी कोणी नसतांना राहत्या घरात ओढणीने गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सुदर्शन वाघमारे, प्रशांत लाड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. ट्रामा केअर सेंटरमध्ये मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. निकीताने महाविद्यालयाच्या दुसर्या वर्षाची परीक्षा दिली होती. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गुरूवारी निकीता हिच्या भावाचा वाढदिवस असल्याचे सांगण्यात आले.

मोठी बातमी : जळगाव दुध संघाची कार्यकारीणी बरखास्त : आता प्रशासकांकडून पाहिला जाणार कारभार

