मोठी बातमी : जळगाव दुध संघाची कार्यकारीणी बरखास्त : आता प्रशासकांकडून पाहिला जाणार कारभार


Executive of Jalgaon Dudh Sangh Dismissed: Management will now be Looked After By Administrators जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघाची विद्यमान कार्यकारीणी कार्यकारीणी बरखास्तीनतंतर दुध संघावर मुख्य प्रशासक म्हणून चाळीसगावचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली तर अन्य दहा जणांचे प्रशासक मंडळही राज्य सरकारने नियुक्त केले.

राज्य सरकारने घेतला प्रशासक बसवण्याचा निर्णय
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या सौभाग्यवती मंदाताई खडसे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा सहकारी दूध संघाची मुदत उलटूनही त्यांना मुदतवाढ मिळाली होती. यातच मंदाताईंची प्रकृती खराब असल्याने गेल्या काही महिन्यांपासून दूध संघाची धुरा ही माजी खासदार वसंतराव मोरे यांच्याकडे आली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर दूध संघावर प्रशासकाच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. आज याला मूर्त स्वरूप आले असून राज्य सरकारने यावर प्रशासक बसविला असून याचा जीआर देखील जारी करण्यात आला आहे.

प्रशासकांमध्ये यांचा समावेश
चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची जिल्हा दूध संघावर मुख्य प्रशासक म्हणून तर प्रशासकीय मंडळात आमदार चंद्रकांत पाटील, माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, आ.गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक अरविंद देशमुख, ओबीसी सेलचे ज्येष्ठ पदाधिकारी अजय भोळे, अमोल चिमणराव पाटील, राजेंद्र वाडीलाल राठोड, अशोक कांडेलकर, अमोल शिंदे, गजानन पाटील आणि विकास पंडित पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !