A Gang Of Cattle Thieves in Aurangabad District in the Net Of Chalisgaon Rural Police औरंगाबाद जिल्ह्यातील गुरे चोरट्यांची टोळी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात
A Gang Of Cattle Thieves in Aurangabad District in the Net Of Chalisgaon Rural Police चाळीसगाव : औरंगाबाद जिल्ह्यातील गुरे चोरट्यांच्या टोळीच्या चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शेख इम्रान शेख ईसा, शेख ईब्राहीम उर्फ मौल्या शेख उस्मान, शेख उमेर शेख ताहीर, सर्फराज बिलाल खाटीक, शेख सत्तार शेख ईसा, शेख इरफान शेख ईसा (सर्व रा.आबदलशा नगर, इदगाह,सिल्लोड, जि.औरगाबाद) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
20 गुरांच्या चोरीची कबुली
चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील खेर्डे, वाघळी शिवार, वडाळी वडाळी, न्हावे, जावळे, रोकडे फाटा, पिंपळवाड निकुंभ आदी गावातून एकुण 20 गुरे चोरुन नेल्याचे या टोळीच्या माध्यमातून उघडकीस आले आहेत. याशिवाय सोनगाव पोस्ट खेर्डे येथील ममराज जाधव यांनी 13 जुलै रोजी दाखल केलेला गुरे चोरीचा गुन्हा देखील उघडकीस आला आहे. अटकेतील गुन्हेगारांकडून आठ हजार रुपये रोख व गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा पिकअप व्हॅन असा 5 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चोरी केलेल्या गुरांची मालेगावात विल्हेवाट
अधिक चौकशीअंती चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीबाहेरील नागद, पिलखोड, हनुमंतखेडा व परिसरातील गुरे चोरी केल्याचे देखील अटकेतील आरोपींनी कबुल केले आहे. चोरी केलेल्या गुरांची विल्हेवाट सिल्लोड व मालेगाव येथे लावत असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून मुख्य सुत्रधांरांचा शोध चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे व त्यांचे सहकारी घेत आहेत. आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
पोलिस निरीक्षक संजय ठेगें यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश चव्हाण, पोलिस उप निरीक्षक लोकेश पवार, स.फौ. राजेद्र सांळुखे, सफौ. अविनाश पाटील, पोहेकॉ नितीन श्रीराम सोनवणे, दत्तात्रय महाजन, कैलास पाटील, दिपक ठाकुर, पोना नितीन किसन आमोदकर, शांताराम सिताराम पवार, गोवर्धन राजेंद्र बोरसे, संदिप ईश्वर पाटील, भुपेश वंजारी, संदिप माने, ज्ञानेश्वर काशिनाथ बडगुजर, देविदास संतोष पाटील, दिनेश विक्रम पाटील, प्रेमसिंग नरसिंग राठोड, विजय पाटील, संदिप पाटील, हिराजी देशमुख, नंदकुमार जगताप, मपोना मालती बच्छाव व चालक सफौ अनिल आगोणे, पोना मनोहर पाटील आदींच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.
भुसावळातील 18 वर्षीय युवतीची आत्महत्या

