फेक अकाउंटद्वारे सोशल मिडीयावर अश्लील फोटो टाकून महिलेची बदनामी : आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात
Defamation Of Woman By Posting Obscene Photos On Social media Through Fake Account : Accused In MIDC Police Net जळगाव : सोशल मिडीयावरील फेक अकाऊंटवर वर्धा शहरातील महिलेचे अश्लिल फोटो अपलोड करून बदनामी केल्याप्रकरणी आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी केल्याच्या आरोपाखाली जळगावच्या संशयीत तरुणास वर्धा पोलिसांनी एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने अटक केली. मुकेश रोहिदास झाल्टे (रा.रामेश्वर कॉलनी जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
रामेश्वर कॉलनीतून आरोपीला अटक
एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने वर्धा पोलिसांनी आरोपीला जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतून अटक केली. ही कारवाई एमआयडीसी पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकातील विकास सातदिवे व नाईम इम्रान सैय्यद यांनी केली. हवालदार सचिन इंगोले यांच्या ताब्यात आरोपीाल देण्यात आले.

भुसावळातील तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीद्वारे प्लॉट विक्री प्रकरण : जनअर्बनचा पसार वसुली अधिकारी जाळ्यात

