नळाचे पाणी भरण्यावरून वाद विकोपाला : जळगावात दोघा बहिणींचा विनयभंग


Argument Broke Out Over Filling Tap Water : Two sisters Molested In Jalgaon जळगाव : दोन भाडेकरूंमध्ये नळाचे पाणी भरण्याच्या कारणावरून हाणामारी होवून दोन बहिणींचा विनयभंग करण्यात आला. ही घटना शहरातील एका भागात घडली. याबाबत शनीपेठ पोलिस ठाण्यात दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पाण्यावरून वाद विकोपाला
शनीपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात दोन बहिणी या भाड्याच्या घरात राहतात. त्यांच्या घराच्या शेजारी मनिषा मनोज कोळी आणि मनोज कोळी हे दाम्पत्य राहते. गुरूवार, 28 जुलै रोजी सायंकाळी घरात पाणी भरण्याच्या कारणावरून दोन्ही बहिणी आणि दाम्पत्यामध्ये वाद झाला. वाद वाढल्याने हाणामारी झाली. यातील मनोज कोळी याने दोन्ही बहिणींशी धक्काबुक्की करून त्यांचा विनयभंग केला. याबाबत रात्री नऊ वाजता दोन्ही बहिणींनी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीवरून शनीपेठ पोलिस ठाण्यात मनिषा मनोज कोळी आणि मनोज कोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार मनोज इंद्रेकर करीत आहे.

नाथाभाऊ स्पष्टच म्हणाले : राजकीय द्वेषापोटी जळगाव दुध संघ चौकशीसाठी समिती : निर्णयाविरोधात खंडपीठात याचिका


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !