रेल्वे रूळांवरून चालणे बेतले जीवावर : पंढरपूरात तीन मजूरांचा मृत्यू
Walking on railway tracks cost lives: Three laborers died in Pandharpur पंढरपूर : पंढरपूर रेल्वेस्थानकापासून 800 मीटरवर लक्ष्मी टाकळी रोड रेल्वेमार्गावर रुळांवरून जाणार्या चार परप्रांतीय मजुरांना रेल्वेची धडक बसली. यात तिघांचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृत मजूर छत्तीसगडमधील रहिवासी आहेत.
रूळांवरून चालणे बेतले जीवावर
पंढरपूर शहरात छत्तीसगडमधील 15 ते 20 मजुरांची टोळी विविध बांधकामांवर काम करीत आहेत. ते उमा महाविद्यालय परिसरातील एका बांधकामाच्या ठिकाणी राहत आहेत. यांच्यापैकी काही जण बुधवारी पहाटे उठून रेल्वेस्टेशनच्या दिशेने गेले होते. हे लोक स्टेशनपासून सुमारे 800 मीटर अंतरावर जुन्या टाकळी रेल्वे गेटजवळ रुळावरून चालत जात होते. त्याच वेळी भरधाव आलेल्या मालगाडीने त्यांना उडवले असल्याचा रेल्वे पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे . मात्र ही घटना सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. जिथे घटना घडली ते ठिकाण निर्मनुष्य असून रुळाच्या दोन्ही बाजूूंनी सुरक्षा भिंत बांधली असल्याने सकाळी उशिरापर्यंत ही घटना समोर आली नाही.

पोलिस प्रशासनाची धाव
दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. या घटनेत हेमलाल गोविंद ठाकूर (29, रा. खजरी ता.खैरागड, जि.राजनांदगाव) आणि पंकज रामचरण मिरवी (23, बिरखा पो.गंडई, जि. राजनांदगाव, छत्तीसगड ) हे दोन जण जागीच ठार झाले, तर सोनू तुलाराम यादव (18), गोकुळ फुलसिंग मिरवी (रा.विरखा गंडई, जि.राजनांदगाव, छत्तीसगड ) हे गंभीर जखमी झाले होते. जखमींना आधी पंढरपूर आणि नंतर तेथून सोलापूर येथे उपचारासाठी हलवण्यात आला. त्यांना उडवले असल्याचा रेल्वे पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे मात्र ही घटना सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. जिथे घटना घडली ते ठिकाण निर्मनुष्य असून रुळाच्या दोन्ही बाजूूंनी सुरक्षा भिंत बांधली असल्याने सकाळी उशिरापर्यंत ही घटना समोर आली नाही.
