वरणगावातील अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवले
वरणगाव : शहरातील एका भागातील अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्या प्रकरणी अल्पवयीन संशयीताविरुद्ध वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील एका भागात 50 वर्षीय वृद्धेसोबत अल्पवयीन नात राहते. शहरातील एका विद्यालयात तिने आठवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर शाळा सोडल्याने ती घरीच राहत असताना 28 रोजी अल्पवयीन तरुणाने तिला फूस लावून पळवून नेले. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुनील वाणी करीत आहे.
