बलिया, गोरखपूर एक्स्प्रेस एलटीटीऐवजी दादर स्थानकाहून सुटणार
भुसावळ : रेल्वे प्रशासनाने मुंबई-बलिया व मुंबई-गोरखपूर या दोन गाड्यांच्या सुटण्याच्या ठिकाणात बदल केला आहे. या गाड्या पूर्वी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून (एलटीटी) सुटत होत्या. आता त्यात दादर स्थानकावरून सुटतील.
नवीन बदलाची घ्यावी नोंद
01026 बलिया-मुंबई ही गाडी बलिया स्थानकावरून बुधवार, 10 सुटून ती दादरला पहाटे 3.30 वाजता पोहोचेल तर 01025 एलटीटी-बलिया ही विशेष गाडी एलटीटी एवजी दादर स्थानकावरून शुक्रवार, 12 रोजी दुपारी 2.05 वाजता सुटेल. तथापी 01028 गोरखपूर-दादर ही गाडी गुरुवार, 11 रोजी दादरला पहाटे 3.30 वाजता पोहोचेल तर 01027 ही गाडी शनिवार, 13 रोजी दादर येथून दुपारी 2.05 वाजता सुटेल. या गाड्या विभागातील स्थानकांवर पूर्वीच्या वेळेत पोहोचणार आहे, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.




