शासनाचा ‘अमृत महोत्सवी’ गोंधळ ! झारीतील शुक्राचार्य कोण ?
भुसावळातील शिक्षणतज्ज्ञ प्र.ह.दलाल यांचा शासनाला थेट सवाल.!
Government’s ‘Amrit Mahotsav’ confusion! Who is Shukracharya in Zari ? भुसावळ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मंगळवार, 9 ऑगस्ट रोजी समूह राष्ट्रगीत कार्यक्रम सकाळी 11 वाजता घेण्याबाबत राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव यांनी सोमवार, 8 ऑगस्ट रोजी पत्र पाठवत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळवण्यात आले. त्यानुसार राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, विविध शासकीय कार्यालांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली. मंगळवारी राज्यात मोहरमनिमित्त आधीच शासकीय सार्वजनिक सुटी स्वतः शासनानेच जाहीर केली असताना अचानक हा निर्णय रद्द करण्यात आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात आले. या गोंधळला जवाबदार कोण? असा प्रश्न भुसावळातील शिक्षण तज्ज्ञ प्र.ह.दलाल यांनी उपस्थित केला आहे.
अचानक आलेल्या आदेशाने सर्वांनाच धक्का
मोहरमच्या सुटीचा त्याग करून सर्व शिक्षक व कर्मचारी आदेशाचे पालन करून राष्ट्रगीत म्हणण्यासाठी उपस्थित राहिले. अनेक विद्यार्थी व शिक्षक खेड्या-पाड्यातून धावपळ करीत कार्यक्रमासाठी हजर झाले. काही ठिकाणी कार्यक्रमही झाला आणि अचानक व्हॉट्सअॅपवर हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे अधिकार्यांनी पाठविलेले पत्र वाचून अनेकांना आश्चर्य वाटले. शाळेत नियोजनाचे महत्व शिकविणार्या शासनाला एव्हढ्या महत्त्वाच्या विषयाचे नियोजन का करता आले नाही? 9 ऑगस्टला कार्यक्रम घ्या हे अगद एक दिवसच आधी तेही व्हॉट्सअॅपवर सांगून शासन कार्यक्रमा बाबत किती गांभीर्याने पाहत आहे हे यातून स्पष्ट झाले आहे.

सामूहिक गोंधळाला जवाबदार कोण?
मंगळवारी कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे पत्रही अगदी त्याच तारखेला व्हॉट्सअॅपवर टाकण्यात आल्यानंतर सर्वांना परत घरी जावे लागले. कार्यक्रम झाला असता तरी त्यामुळे काहीही फरक पडणार नव्हता मात्र नियोजित राष्ट्रगीत गायनाच राष्ट्रप्रेमाचा महत्त्वाचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्यात आला मात्र अती उत्तम कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्याचे कारण काय? तेही आता शासनाने स्पष्ट करावे, अशी मागणी दलाल यांनी केली आहे.राज्यात सर्वत्र झालेल्या हया सामूहिक गोंधळाला, शासनाच्या बदनामीला व कर्मचार्यांना झालेल्या मानसिक त्रासाला नेमके कोण जबाबदार आहे ? नेमके कारण तरी काय आहे? कोण आहे झारीतील शुक्राचार्य? ह्या प्रश्नांची उत्तरे नागरीकांना कळलीच पाहिजे, असे प्र.ह.दलाल यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे.
