Big news : Indo-Tibetan border police bus falls into valley: Six jawans martyred: Death toll feared to riseमोठी बातमी : इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांची बस दरीत कोसळली : सहा जवान शहिद : मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Big news: Indo-Tibetan border police bus falls into valley: Six jawans martyred: Death toll feared to rise नवी दिल्ली : इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांची बस दरीत कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत सहा जवान शहिद झाले. या बसमध्ये सुमारे 39 जवान होते. अपघातात अनेक जवान गंभीर जखमी झाले आहे. या अपघातामध्ये बसचा अक्षरशः चुराडा झाला. ही बस चंदनवाडीहून पहलगामच्या दिशेने येत असताना ती दरीत कोसळली
ब्रेक निकामी झाल्याने अपघात
39 जवानांपैकी 37 आयटीबीपीचे आणि 2 जम्मू-काश्मीर पोलिसांचे आहेत. या सर्वांना घेऊन जाणार्या बसचे ब्रेक निकामी झाल्यानंतर ती रस्त्याच्या कडेला नदीत कोसळली. पोलिस आणि अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. युद्धपातळीवर बचावकार्य तातडीने सुरु करण्यात आलं. जखमी जवानांनी अपघातग्रस्त बसमधून बाहेर काढण्यात आलं. रुग्णवाहिकांही जखमी जवानांना घेऊन लगेचच रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, 32 जवान या दुर्घटने गंभीर जखमी झालेत. मृतांचा आकडा आणखी वाढेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

Pahalgam, J&K | Six ITBP personnel have lost their lives, while several other personnel received injuries, who are being airlifted to Army hospital, Srinagar for treatment: Police
A bus carrying 37 ITBP personnel and two J&K Police personnel fell into riverbed in Pahalgam today pic.twitter.com/lVhNooPzlT
— ANI (@ANI) August 16, 2022
