चारीत्र्याच्या संशयातून पत्नीचा केला खून : या शहरातील घटना


Wife killed due to suspicion of character : incident in this city नाशिक : चारीत्र्यांच्या संशयातून खून करणार्‍या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. रीजवान इसाक पठाण (34 रा.बाग ए तबस्सुम,वडाळागाव) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास पत्नी हुमेरा उर्फ मिनाज रीजवान पठाण (29 रा.बाग ए तबस्सुम,वडाळागाव) आरोपी पतीने चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केला

वायरने आवळला गळा
वडाळा गावात चार्जरच्या वायरने पतीने आपल्या 29 वर्षीय पत्नीचा गळा दाबून खून केला होता. हुमेरा या नेहमीप्रमाणे आपल्या बेडरूममध्ये झोपलेल्या असतांना रिजवानने मोबाईल चार्जीगच्या वायरने गळा आवळला. यात हुमेरा पठाणचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी हुमेराचा भाऊ गुलाम शेख यांनी तक्रार दिली असून पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास निरीक्षक वांजळे करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !