Five people died on the spot in a horrific accident on the Pune-Nagar highway पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघातात पाच जण जागीच ठार


Five people died on the spot in a horrific accident on the Pune-Nagar highway पुणे : पुणे-अहमदनगर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी रात्री दिड वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. चुकीच्या दिशेने प्रवास करत असलेला ट्रक अचानक रोडच्या मधोमध आल्याने कारची आणि ट्रकची जोरदार धडक झाल्याचे सांगण्यात आले. या अपघातात एक जण जखमी झाला.

यांचा झाला मृत्यू
या अपघाता तीन लहान मुलांचा मृत्यू झाला. संजय भाऊसाऊहेब म्हस्के (53), राम भाऊसाहेब म्हस्के (45), राम राजू म्हस्के (7), हर्षदा राम म्हस्के (4), विशाल संजय म्हस्के (16) वर्ष यांचा मृत्यू झाला. तर साधना राम म्हस्के या अपघातात गंभीर जखमी झाल्या.

प्रवासी पनवेलला जाताना अपघात
रांजणगाव एमआयडीसीतील एल.जी.कंपनीसमोर हा भीषण अपघात झाला. या कारमधील सर्व प्रवासी पनवेलला जात असल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने वाहने हटविण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !