Big News : Elections of 92 municipalities in the State Postponed ! मोठी बातमी : राज्यातील 92 नगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर !
Big News : Elections of 92 municipalities in the State Postponed ! नवी दिल्ली : राज्यातील 92 नगरपरीषदांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्यात ओबीसी आरक्षण लागू करण्याची मागणी राज्य शासनाने केली होती. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत, पाच आठवडे स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे निर्देश मिळाल्याने निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत. दरम्यान आरक्षणा संदर्भात सुनावणीसाठी विशेष खंडपीठ गठीत केले जाईल.
सर्वोच्च न्यायालयात पुर्नविलोकनाची याचिका दाखल
महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. 92 नगरपरीषदांमध्ये आरक्षण लागू व्हावं, अशी सरकारने मागणी केली आहे. राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकनाची याचिका दाखल करण्यात आली आहे. या सुनावणी दरम्यान, सुनावणीसाठी विशेष खंडपीठ गठीत केलं जाणार आहे. तसेच, पाच आठवडे सुनावणी ‘जैसे थे’च ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. त्यामुळे 92 नगरपरिषदांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.

आरक्षणासह निवडणुका होण्याची शासनाची भूमिका
राज्य निवडणूक आयोगानं 92 नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. या नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या, तेव्हा सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाबाबत सुनावणी सुरू होती. या 92 नगरपरिषदांमधील निवडणुका ओबीसी आरक्षणासह करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू होता. सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षणाबाबत निकाल दिला, त्यावेळी या संदर्भातली निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे आता तिथे ओबीसी आरक्षण लागू करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. राज्य निवडणूक आयोगानं 14 जुलै रोजी या 92 नगरपरीषदांच्या निवडणुका स्थगित केल्याची घोषणा केली होती.
या जिल्यातील निवडणुका पडल्या लांबणीवर
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलढाणा या 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार होत्या.
