फैजपूर पालिका सभेत 13 विषयांना मंजुरी


शहर हद्दवाढीचा डीपीआर तयार होण्याचा मार्ग मोकळा

फैजपूर : फैजपूर पालिकेची सर्वसाधारण सभा पालिकेच्या सभागृहात शुक्रवारी नगराध्यक्षा महानंदा होले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेच्या सुरुवातीला 163 व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर सभेत विषपत्रिकेवर 14 विषय चर्चेसाठी होते. या सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली.

या विषयांना पालिका सभेत मंजुरी
फैजपूर शहराची नुकतीच झालेल्या हद्दवाढीचा डीपीआर (विकास योजना) तयार करणे, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत थ्रीस्टार रेटींगसाठी नामांकन मिळणे कामी विचार विनिमय करणे, नगरपालिका हद्दीतील मिल्लत नगर येथील गट नंबर 558 मधील खुल्या जागेत हरीतपट्टा विकसीत करण्याच्या कामाला मुदत वाढ देणे, फैजपूर पालिकेच्या झालेल्या विविध 49 विकास कामांची तपासणी करण्यासाठी कार्यकारी अभियंता दक्षता व गुण नियंत्रण नाशिक यांच्याकडे तपासणी शुल्काचा भरणा पालिका फंडातून करणे, पालिका संचलित रुग्णालयात मानधन तत्वावर असलेल्या वैद्यकीय अधिकारी यांचा राजीनामा अर्ज आल्याने नवीन वैद्यकीय अधिकारी नेमण्यसाठी कारवाई करणे, दलित वस्ती योजनेंतर्गत पोस्ट कार्यालय परीसरात व आठवडे बाजारातील सिटी सर्वे नंबर 3777 मार्केटमधील रमेश साळी यांच्या दुकानापासून ते सदगुरू टॉकीजपर्यंत रस्ता डांबरीकरण करणे यासह विषय पत्रिकेवरील 13 विषयांवर विचार विनियमय करून मंजुरी देण्यात आली.




यांची सभेला उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष महानंदा होले, उपनगराध्यक्ष रशीद तडवी, मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांची उपस्थिती होती. सभेला भाजपा गटनेते मिलिंद वाघूळदे, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक हेमराज चौधरी, काँग्रेस गटनेता कलीमखा मण्यार, राष्ट्रवादी काँग्रेस गटनेता शेख कुर्बान यांच्यासह नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते. कनिष्ठ अभियंता सईद शेख, सभा लिपिक सुधीर चौधरी, लिपिक संतोष वाणी आदींनी सहकार्य केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !