यावल पालिकेच्या प्रभारी नगराध्यक्षपदी राकेश कोलते
यावल : यावल पालिकेच्या नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांनी निवडणुकीनंतर सहा महिन्याआत जात प्रमाणपत्र सादर न केल्याने जिल्हाधिकार्यांनी त्यांना अपात्र ठरवले होते. पालिकेतील नगराध्यक्षपदाच्य रीक्त जागेवर उपनगराध्यक्ष राकेश कोलते यांच्या नियुक्तीचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत. दरम्यान, नगराध्यक्ष अपात्र झाल्यानंतर मुख्याधिकारी यांनी याबाबत जिल्हाधिकारी, जळगाव यांना पत्रव्यवहार केला होता. त्यानुर प्रभारी जिल्हाधिकारी डॉ.नंदकुमार बेडसे यांनी 7 रोजी उपनगराध्यक्षांकडे पदभार सोपण्याचे पत्र यावल पालिकेला दिले आहे. दरम्यान, प्रभारी नगराध्यक्षपदी निवड झाल्याने कोलते यांच्यावर नगरसेवक तसेच चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
