Power struggle in Maharashtra: Hearing will be held on September 27 महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : आता 27 सप्टेंबरला होणार सुनावणी


Power struggle in Maharashtra: Hearing will be held on September 27 नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आता 27 सप्टेंबरपर्यंत सुनावणी पुढे ढकण्यात आल्याने नेमका काय निर्णय येतो? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. बुधवारी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे पहिली सुनावणी झाली असता दोन्ही पक्षाकडून अत्यंत आक्रमक युक्तिवाद झाला मात्र 10 मिनिटांच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाने शिवेसनेच्या पक्षचिन्हासंदर्भात येत्या 27 सप्टेंबरपर्यंत कुठलाही निर्णय घेऊ नये, असे सांगत पुढील सुनावणी ही 27 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली.

पाच न्यायमूर्तीचे घटनापीठ गठीत
निवडणूक आयोगाच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी 5 न्यायमूर्तींचं घटनापीठ गठित करण्यात आलं आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्त्वाखालील घटनापीठ या प्रकरणाचा निर्णय घेतील. या घटनापीठे पुढे यासंदर्भातील पहिली सुनावणी होती. मात्र, सुनावणी सुरू होताच खंडपीठाने ही सुनावणी पुढे ढकलली आहे. पुढील सुनावणी ही 27 सप्टेंबर रोजी होईल.

10 मिनिटे दोन्ही बाजूकडून युक्तीवाद
ठाकरे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ज्ञ कपील सिब्बल यांनी आक्रमक युक्तिवाद करत फुटीनंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्पष्टता येणं गरजेचं आहे, असं म्हणत निवडणूक आयोगाला तूर्तास पक्षचिन्हाचा निर्णय घेऊ देऊ नका, अशी विनंती केली. कोर्टाने ती विनंती मान्य करत 27 तारखेपर्यंत निवडणूक आयोगाने पक्षचिन्हावर निर्णय घेऊ नये. 27 तारखेला 10 मिनिटे दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घटनापीठ पुढचा निर्णय देईल, असे न्यायालय म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !