Death of children in Shirsoli due to drowning पाण्याच्या डोहात बुडाल्याने शिरसोलीतील दोघा बालकांचा मृत्यू


Death of children in Shirsoli due to drowning जळगाव : डोहात पोहण्यासाठी गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने शिरसोली, ता.जळगाव येथील दोघा चिमुरड्यांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी दिड वाजता घडली. निलेश राजेंद्र मिस्त्री (17) व श्रवण शिवाजी पाटील (15, दोन्ही रा.भोलानाथ नगर, शिरसोली) अशी मयत विद्यार्थ्यांची नावे आहेत. दरम्यान, या दुर्दैवी घटनेतून नववीत शिक्षण घेणारा जय जालिंदर सोनवणे बचावला आहे.

पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले चिमुकले
सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी शिरसोलीजवळ डोहात पोहण्यासाठी तीन शाळकरी मित्र गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने श्रवण व निलेश बुडाले तर जय हा या घटनेतून बचावला. जळगावत तालुक्यातील शिरसोली येथील धारागिर शिवारात ही घटना घडली. दोघा शाळकरी मुलांचे मृतदेह एमआयडीसी पोलिस ठाण्यातील समाधान टाकळे, शुद्धधन ढवळे दोन कर्मचार्‍यांनी गावकर्‍यांच्या मदतीने बाहेर काढले. दोन्ही मुलांचे मृतदेह जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. या घटनेने शिरसोली परीसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !