देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी वीर सावरकरांचेही योगदान : उज्वल सराफ


भुसावळ : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अनेक महान विभूतींचा वाटा असून त्यात वीर सावरकरांचेही नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रिटिशाविरुद्ध लढण्यासाठी मोठे प्रयत्न केले. स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जनमानसात जागृती करण्यासाठी त्यांना एकत्रीत आणण्यासाठी तयांचे मोठे योगदान होते शिवाय सैन्याचे सैनिकीकरण, भारत देश अण्वस्त्रधारी होण्यासह मंदिरे बांधून ती सर्वांसाठी खुली व्हावीत यासाठी त्यांचे मोठे योगदान राहिल्याचे मत श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरीक संघाच्या सभेत वक्ते उज्वल सराफ यांनी व्यक्त केले.

यांची सभेला उपस्थिती
श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरीक संघाची सभा नुकतीच झाली. सभेची सुरुवात राम नाम जपाने जी.आर.ठाकूर मामासाहेब यांनी केली. श्री गोंदावलेकर महाराज यांचे प्रवचन आणि विश्वप्रार्थना अलका ढाके यांनी म्हटले. वक्त्यांचा परीचय गोपाल तिवारी यांनी करून दिला. प्रमुख वक्त्यांचे स्वागत संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब सोनवणे यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन केले. आभारपोपटराव पाटील यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !