नाशिक पुन्हा खुनाने हादरले : एकतर्फी प्रेमातून मुलीच्या भावाचा खून
Nashik Again Rocked By Murder: Girl’s Brother Killed Due To One-sided love नाशिक : शहरातील खुनांच्या घटना थांबायला तयार नाहीत. एकतर्फी प्रेम असलेल्या तरुणाने चक्क तरुणीच्या भावालाच संपल्याची घटना शहरातील पंचवटीमधील कालिकानगरात शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी आरोपी किरण रमेश कोकाटे याला अंबड येथून अटक करण्यात आली. या घटनेत मुलीचा भाऊ रवी सलीम सय्यद (20) याचा खून झाला आहे.
असे आहे नेमके प्रकरण
मध्यतंरी रवी सय्यद याच्या बहिणीला आरोपीने पळवून नेले. या घटनेची तक्रार मुलीचे आई-वडील पंचवटी पोलिसात पोलिस स्थानकात दिली मात्र या तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली नाही. त्यानंतर मुलीला शोधल्यानंतर आरोपी वारंवार मुलीच्या वडिलांना व त्याच्या भावाला घरी बोलून तुझी मुलगी आम्हाला दे नाही तर आम्ही तुझा खून करू अशी धमकी देत होता.



अखेर केला खून
शेवटी तीच कुरापत उफाळल्यानंतर कालिकानगर येथून रवी सय्यद पायी जात असतांना रीक्षातून पाठीमागून आलेल्या आरोपी किरण कोकाटे याने चॉपरने हल्ला केल्याने रवीचा मृत्यू ओढवला. खून प्रकरणी रवीचे नातेवाईक युसुफ अमीर सैय्यद यांनी पोलिस स्थानकात तक्रार दिल्याने पंचवटी पोलिसांनी भादंवि 302 सह 135 मपोका अन्वये गुन्हा दाखल केला. तपास पोलिस निरीक्षक रणजीत नलवडे करीत आहेत.
