पांझरा नदीच्या पुरात धुळ्यातील तरुण वाहिला



धुळे :  पांझरा नदीच्या पुरात शहरातील मोगलाई भागातील फुले कॉलनीतील 23 वर्षीय तरुण वाहिल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. अक्षय उर्फ तात्या सोनवणे हा तरुण पाण्यात पोहताना वाहिल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पोलिस प्रशासनासह राज्य आपत्ती प्रतिसाद दल अर्थात एनडीआरएफ पथकाने तरुणाचा शोध घेण्याचे काम सुरू केले असून दुपारपर्यंत तरुणाचा शोध लागला नाही. पांझरा नदी किनारी परीसरातील नागरीकांनी मोठी गर्दी केली आहे.


कॉपी करू नका.