घरकुलांची कामे करण्यास टाळाटाळ करणार्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करा : रावेरात मनसेची मागणी
रावेर : शहर आणि तालुक्यातील गोरगरीब कुटुंबियांना राहण्यासाठी निवारा नाही अशा बेघर कुटुंबांचे घरांचे स्वप्न साकारण्यासाठी शासनाने घरकुल योजना अंमलात आणली. दारीद्य्र रेषेखालील यादीतील गुणांकानुसार लाभार्थी निवडची प्रक्रिया राबविल्यानंतर प्राधान्यक्रम दिला जातो. असे असताना शहर व तालुक्यात शेकडो लाभार्थींना कमी पैशात घरकूल बांधून देण्याच्या नावाखाली बांधकाम ठेकेदार व मिस्तरी फिरवा-फिरव करीत असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते संदीपसिंह राजपूत यांनी प्रसिध्दीव्दारे केली आहे.

