रामदासजी आठवले जिथे, सत्ता तेथे : ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन
Where Ramdasji is remembered, there is power: Rural Development Minister Girish Mahajan भुसावळ : रामदास आठवले जिथे जातात सत्ता तेथे येत असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले. शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर सोमवारी सायंकाळी रीपाइंच्या 66 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित भव्य मेळाव्यात ते बोलत होते.
महापुरूषांना मर्यादीत ठेवू नये
महाजन म्हणाले की, आठवले साहेब तुम्ही आता नेहमीसाठीच आमच्यासोबत रहा, आम्ही तुम्हाला आता सोडणारच नाही. देशाची वाटचाल महाशक्तीच्या दिशेने सुरू असून महामानवाने देशाला घटना दिल्याने मी देखील या पदापर्यंत पोहोचू शकल्याचे ते म्हणाले. शिवजयंती असो की महामानवाची जयंती आपण ती आवर्जून साजरी करतो, लेझीम खेळतो मात्र आपण महापुरूषांना समाजापुरता मर्यादीत ठेवू नये, ते सर्वांचे आहेत, असेही ते म्हणाले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री अविनाश महातेकर, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, रीपाई उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, जळगाव जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, गौतम सोनवणे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यशा चंद्रकांता सोनकावळे, अॅड.अयुब शेख, कोकण प्रदेशाध्यक्ष जगदीश गायकवाड, नाशिक जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, राष्ट्रीय नेत्या आशा लांडगे, रोहन सूर्यवंशी, लक्ष्मण जाधव, शरद सोनवणे, पप्पू सुरडकर यांच्यासोबत अधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
