Poet Ramdas Athavale मला वाढवायचे आहे, राज्याचे बळ, म्हणून मी आलो भुसावळ : कवी रामदास आठवलेंनी जिंकली भुसावळकरांची मने
I want to increase the strength of the kingdom, so I came to Bhusawal : Poet Ramdas Athavale won the hearts of Bhusawalkar भुसावळ : केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले जसे उत्तम वक्ते, नेते आहेत तसेच ते कवीदेखील आहे त्यामुळे ते भुसावळात नेमके काय बोलणार याची उत्सुकता भुसावळकरांना होती. मंत्री आठवले यांनी भाषणाची सुरूवातच आपल्याला स्व-रचित कवितेतून करीत उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या. ते म्हणाले की,
मला वाढवायचे आहे, राज्याचे बळ, म्हणून मी आलो भुसावळ

मी कधीच केला नाही छळ,
म्हणून माझ्या पाठीशी आहे हे भुसावळ
रीपाइं जिल्हाध्यक्षांनी केले स्वागत
याप्रसंगी मंत्री आठवले यांचे आयोजक तथा रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी भला मोठा हार घालून स्वागत केले. याप्रसंगी विविध पदाधिकार्यांनी मंत्री आठवले यांचे स्वागत केले.
संविधान मान्य करावा अन्यथा चले जाव
मंत्री आठवले आपल्या भाषणात म्हणाले की, या देशात राहणार्यांना संविधान मान्य करावेच लागेल व ज्यांना संविधान मान्य नसेल त्यांनी देश सोडावा. संविधानाचे संरक्षण करणार्यांसोबत मी असून देशातील कोणत्याही पंतप्रधानाने संविधानाला माथा टेकला नाही मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यास अपवाद आहेत.
भारताला तोडणार्यांविरोधात चळवळ उभारली
केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले की, मी नुकताच मॉरीशस दौरा केला व महामानवाच्या पुतळ्याचे उद्घाटन माझ्याहस्ते करण्यात आले. महामानवाचे विचार हे समस्त मानवजातीला एकत्र करणारे आहेत. बाबासाहेबांना जातीव्यवस्था संपवायची होती, त्यांचा ब्राह्मणांना कधीही विरोध नव्हता मात्र ब्राह्मण्यवादाचा त्यांनी नेहमीच विरोध केल्याचे ते म्हणाले. भारताला तोडणार्यांविरोधात मी चळवळ उभारल्याचे ते म्हणाले.
प्रचार करणारे करीत राहतील
आठवले म्हणाले की, भाजपाविषयी काही लोक प्रचार करीत आहेत मात्र टिका करणार्यांना करू द्या मी त्यांच्यासोबत आहे. संविधानाचे संरक्षण करणार्यांसोबत मी आहे. संविधानापुढे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी माथा टेकवला असल्याचे आठवले म्हणाले. मराठवाडा विद्यापीठ नामांतरासाठी 17 वर्ष संघर्ष चालला व त्यानंतर आमच्या प्रयत्नांनी विद्यापीठाला महामानवाचे नाव मिळाल्याचे त्यांनी सांगत एकदा आम्ही आंदोलन करायला लागलो की मागे हटत नाही.
शिंदे-ठाकरेंमधील सामना होणार रंजक
आठवले म्हणाले की, उद्धव ठाकरेंना दसर्या मेळाव्यासाठी शिवतीर्थ मैदान मिळाले असून त्यांना भाषणासाठी शुभेच्छा देतो कारण तेदेखील माझे चांगले मित्र आहेत मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आता सर्व आमदार असल्याने तेदेखील मुख्यमंत्री झाल्यापासून मिश्कीलपणे बोलतात त्यामुळे दोघांमधील भाषणाचा सामना रंजक होणार असल्याचे आठवले म्हणाले. भुसावळातील रीपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
आयोजक राजूभाऊ सूर्यवंशींचे तोंडभरून कौतुक
मंत्री आठवले यांनी रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांचे सभेचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल तोंडभरून कौतुक केले. मोठ्या प्रमाणावर सभेला झालेली गर्दी पाहून आठवले भारावले. राजू सूर्यवंशी यांनी सभेच्या यशस्वीतेसाठी घेतलेले परीश्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढल्े.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री अविनाश महातेकर, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, रीपाई उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, जळगाव जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, गौतम सोनवणे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यशा चंद्रकांता सोनकावळे, अॅड.अयुब शेख, कोकण प्रदेशाध्यक्ष जगदीश गायकवाड, नाशिक जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, राष्ट्रीय नेत्या आशा लांडगे, रोहन सूर्यवंशी, लक्ष्मण जाधव, शरद सोनवणे, पप्पू सुरडकर यांच्यासोबत अधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
