Satri woman dies due to lack of timely treatment सात्रीच्या महिलेचा वेळीच उपचार न मिळाल्याने मृत्यू


Satri woman dies due to lack of timely treatment अमळनेर : वेळेवर उपचार न मिळाल्याने सात्री येथील गावातील उषाबाई रामलाल भिल (53) या महिलेचा मृत्यू झाला. सात्री गावाला स्वातंत्र्यपूर्वीपासून जायला रस्ता नाही शिवाय बोरी नदीवर पूल नाही तर दुसरीकडे पुर्नवसनाअभावी गावाचा विकास कागदावरच आहे. गतवर्षीदेखील 11 वर्षीय उपचाराअभावी मृत्यू झाला मात्र त्यानंतरही प्रशासनाला पाझर फुटलेला नाही. किमान आतातरी महिलेच्या मृत्यूनंतर प्रशासनाने उपाययोजना करण्याची अपेक्षा आहे.

वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू
सात्री गावातील उषाबाई भील यांच्या छातीत दसर्‍याच्या दिवशी पहाटे साडे तीन वाजता कळा आल्या, उलटी झाली मात्र दवाखान्यात नेण्यासाठी नदी पार करण्याचे आव्हान होते तर दुसरीकडे पाण्यामुळे बैलगाडीही नदीतून नेणे अशक्य होते. अखेर ग्रामस्थांनी झोळी तयार करून उषाबाईंना बसवले व नदी पार करण्यात आली मात्र यात मोठा कालावधी उलटल्याने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आल्यानंरत डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !