फेकरीतील प्रा. तेजस पाटील यांना पीएचडी पदवी प्रदान
भुसावळ : भुसावळ तालुक्यातील मूळचे फेकरीतील रहिवासी तथा प्रियदर्शनी भगवती अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूरचे सहाय्यक प्रा.तेजस राजेंद्र पाटील यांना भोपाळ येथील मध्यांचल प्रोफेशनल युनिव्हर्सिटीतर्फे पीएचडी पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली.
यशाचे श्रेय कुटूंबियांना
प्रा.तेजस पाटील यांनी डॉ.एम. पी.वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘टू डिटरमिनेशन ऑफ मॉड्युल इव्हालुएट कॅरक्टरीस्टीक ऑफ काँक्रीट एज अ कोर्स एग्रीगेट’ या विषयात शोधनिबंध सादर केला. प्रा.तेजस पाटील हे नाहाटा महाविद्यालयात कार्यरत प्रा.डॉ.भाग्यश्री भंगाळे यांचे बंधू आहेत. त्यांनी यशाचे श्रेय संस्थाध्यक्ष डॉ.सतीश चतुर्वेदी व प्राचार्य डॉ.एन.के.चौधरी, विभागप्रमुख व कुटुंबीयांना दिले आहे.
