रावेरात बांधकाम स्थळावरून चोरट्यांनी साहित्य लांबवले
रावेर : शहरातील बाबा बूट हाऊस शेजारील विशाल हनुमान डोईफोडे यांच्या बांधकाम स्थळावरून मिस्तरी कामगारांचे तीन हजार दोनशे रुपये किंमतीचे साहित्य चोरट्यांनी लांबवले.
अज्ञाताविरोधात गुन्हा
या प्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार तथा मिस्तरी नथुराम वर्मा (33) यांच्या मालकिचे दोन ग्राईंडर मशीन व लोखंडी प्लेट आदी तीन हजार दोनशे रुपयांचे साहित्य चोरट्यांनी बांधकाम स्थळावरून 8 ते 9 ऑक्टोबदरम्यान लांबवले. तपास एएसआय ईस्माईल शेख करीत आहेत.
