वाळू माफियांची दादागिरी : यावल तहसील आवारातून डंपर लांबवले
Bullying By Sand Mafia : Dumper extended from Yawal Tehsil Premises यावल : जिल्ह्यातील वाळू माफियांची दादागिरी वाढली असतानाच यावल तहसील कार्यालयाच्या आवारातून जप्त वाळूचे डंपर चौघांनी लांबवल्याची घटना उजेडात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यावल पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल
यावल महसूल विभागाने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, यावल शहरातून बेकायदेशीरीत्या वाळूची वाहतूक करणारे डंपर क्रमांक (एम.एच.19 सी.वाय.8656) याच्यावर कारवाई करून ते तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले. गुरुवार, 13 ऑक्टोंबर रोजी पहाटे 3 ते सकाळी 6 वाजेच्या दरम्यान गणेश गंगाराम केळी (23, ममुराबाद, ता.जळगाव), संदीप आधार सोळंके (रा.कोळन्हावी, ता.यावल) यांच्यासह इतर दोघांनी यावल तहसील कार्यालयाचे बंद गेट तोडून अनधिकृतपणे प्रवेश करून सहा लाख दोन हजार रुपये किंमतीचे वाळूचे डंपर चोरून नेले.

वाळू माफियांची ‘दादागिरी’ वाढली
यावल तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक अधिकारी दीपक बाविस्कर यांच्या फिर्यादीनुसार संशयीताविरोधात यावल पोलिसात संशयीत आरोपी गणेश गंगाराम कोळी (23, ममुराबाद), संदीप आधार सोळंके (कोळन्हावी) यांच्यासह इतर दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहे.