Two-wheeler thieves in Parola police net दुचाकी चोरटे पारोळा पोलिसांच्या जाळ्यात
Two-wheeler thieves in Parola police net पारोळा : शहरातील लोहारगल्लीतून एकाची दुचाकी लांबविणार्या दोन चोरट्यांना पारोळा पोलिसांनी अटक केली. दोघांवर पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

गोपनीय माहितीवरून आरोपींना अटक
पारोळा शहरातील लोहारगल्लीत राहणारे अनिल नारायण लोहार यांचे अंगणात पार्किंगला लावलेली दुचाकी (एम.एच.19 डी.एफ. 9983) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयीत आरोपी सचिन पंडित चौधरी (32) व स्वामी सुरेंद्र लक्ष्मण चौधरी (19, दोघा रा. शेवडे गल्ली, पारोळा) यांना पारोळा पोलिसांनी अटक केली. दोघांनी दुचाकी चोरीचा गुन्हा कबुल केला आहे. दरम्यान चोरीची दुचाकी ही धुळ्यातील निखिल राजेंद्र चौधरी याला दहा हजारात विकल्याची कबुली दिल्यानंतर निखीलला अटक करण्यात आली व दुचाकीही जप्त करण्यात आली. न्यायालयाने तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नाना पवार, संदीप सातपुते, किशोर भोई, अभिजीत पाटील, राहुल कोळी आदी करीत आहेत.