यावल- विरावली रस्त्यावर ॲपे उलटली ; एक जण ठार तर दोन गंभीर
यावल : तालुक्यातील विरावली ते यावल रस्त्याच्या दरम्यान शुक्रवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास विरावली गावातून जळगावकडे निघालेली ॲपे
(एम. एच.१९ बीजे ८९४१) चालकाचा ताबा सुटल्यानेक् रस्त्याच्या बाजुस असलेल्या खड्ड्यात उलटली. या भीषण अपघातात एक ठार तर दोन जणं गंभीर जखमी झाले. दरम्यान जखमींना उपचारासाठी प्रथम यावल येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते मात्र यातील गंभीर जख्मी दस्तगीर सबाज तडवी (विरावली , ता.यावल) यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तत्काळ जळगाव येथील डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी घेवुन जात असताना रस्त्यातच ते मरण पावलेत.
अपघातानंतर चालक पसार
दरम्यान, सदर अपघातास कारणीभुत ऑटो रिक्षा चालक हा अपघाताच्या स्थळावरून पसार झाला. , याविषयी मयत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांकडुन संताप व्यक्त करण्यात येत असून या प्रकरणी चौकशी होऊन ॲपे रीक्षा मालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी नातेवाइकांकडून करण्यात येत आहे. मयत हे हिंगोली जिल्हा येथे सेवेत कार्यरत असलेले आरटीओ आसिफ तडवी यांचे वडिल आहेत,.
