रावेरात सुनेचा छळ : किराणा व्यापार्‍यासह चौघांविरोधात गुन्हा


Harassment of daughter-in-law in Rawer : Case against four including grocer रावेर : हुंडा कमी दिल्याच्या कारणावरुन तसेच सुनेचा छळ केल्याप्रकरणी रावेरातील रामानंद किराणाचे मालक प्रकाश मुलचंदानीसह चौघांविरुध्द रावेर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.

हुंडा कमी दिल्याने सुनेचा छळ
रावेर शहरातील शनी मंदिर कॉलनीत रहिवासी हर्षदा कन्हैयालाल मुलचंदानी (33) हिच्या वडीलांनी लग्नात हुंडा कमी दिला या कारणावरुन रावेर शहरातील रामानंद किराणाचे मालक सासरे प्रकाश मुलचंदानी, सासु मोहिनी मुलचंदानी, जेठ कैलास मुलचंदानी, जेठानी पार्थना मुलचंदानी यांनी हर्षदा मुलचंदानी यांचा सातत्याने मानसिक छळ केला. छळ असह्य झाल्याने हर्षदा यांनी पोलिसात धाव घेत सासरे, सासु, जेठ व जेठानी यांच्याविरुद्ध रावेर पोलिस स्थानकात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एएसआय इस्माईल शेख करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !