Fourth railway line to be built between Jalgaon-Manmad: Survey approved जळगाव-मनमाडदरम्यान होणार रेल्वेचा चौथा मार्ग : सर्वेक्षणाला मंजुरी
Fourth railway line to be built between Jalgaon-Manmad: Survey approved भुसावळ : जळगाव-मनमाडदरम्यान चौथ्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या मंजुरीचे पत्र मध्य रेल्वेच्या मुंबईतील मुख्य कार्यालयाकडून नुकतेच भुसावळ विभागाला प्राप्त झाले आहे. या मंजुरीनंतर भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
सर्वेक्षणासाठी दिड कोटींचा निणी मंजूर
या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी रेल्वे मंत्रालयाने दीड कोटीचा निधी मंजूर केला आहे. रेल्वेची मान्यता असलेल्या एजन्सीला सर्वेक्षणाचे काम देण्यात येणारे आहे. सर्वेक्षणानंतर तो अहवाल मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात येणार आहे.
