भुसावळात अनोळखी वयोवृद्धाचा मृतदेह आढळला


भुसावळ : रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर जळगावकडील बाजूला शनिवारी सायंकाळी सातच्या पूर्वी एका 65 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. याबाबत उपव्यवस्थापक यांनी दिलेल्या माहितीवरून लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

लोहमार्ग पोलिसांनी केले आवाहन
नोळखीच्या मृतदेहाचे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अनोळखी व्यक्ती बद्दल कुणाला काही माहिती असल्यास त्यांनी लोहमार्ग पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन तपासाधिकारी हवालदार सुधीर पाटील यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !