सांगवी बुद्रुक गावातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण


Abduction of a 14-year-old minor girl from Sangvi Budruk Village यावल : तालुक्यातील सांगवी बुद्रुक या गावातून एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे गावातीलच तरुणाने अपहरण केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकीवरून येत तरुणीला पळवले
सांगवी बुद्रुक ता. यावल येथील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाकडून यावल पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी सोमवारी सायंकाळी आपल्या घराच्या ओट्यावर होती. त्या ठिकाणी गावातीलच रोनक राजू तडवी हा दुचाकी घेऊन आला व अल्पवयीन मुलीला कसले तरी आमिष दाखवत फुस लावून तिला पळवून पसार झाला.

तरुणाविरोधात यावल पोलिसात गुन्हा
हा प्रकार निदर्शनास येताच पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी यावल पोलिस ठाणे गाठून तक्रार दिल्यानंतर राजू तडवी याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास यावल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !