वृद्धेच्या डोळ्यावर स्प्रे मारत फैजपूरातील तरुणीला पळवले


Faizpur young woman was run over by spraying on the old woman’s eyes फैजपूर : पंजाबी ड्रेस घालून आलेल्या एकाने आजीच्या डोळ्यावर स्प्रे मारत सोबत असलेल्या तरुणीला पळवून नेल्याची खळबळजनक घटना शहरातील बस स्थानकाजवळील प्रांत कार्यालयाकडे जाणार्‍या रस्त्यावर सोमवार. 17 रोजी घडली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा
निर्मला रमेश जैन (60) यांनी पोलिसात फिर्याद दिल्यानंतर सोमवार, 17 रोजी निर्माला जैन या नात कोमल राजेंद्र शिंपी (22) सोबत बस स्थानकाजवळील प्रांत कार्यालयाकडे जाणार्‍या रस्त्यावरून जात असताना अज्ञात इसम पंजाबी ड्रेस घालून आला व त्याने निर्मला जैन यांच्या डोळ्यावर स्प्रे मारत 22 वर्षीय नात कोमलला पळवले. या प्रकरणी निर्माला जैन यांनी तत्काळ पोलिस स्थानक गाठत घडलेली माहिती दिली. याप्रकरणी अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार रवींद्र मोरे हे करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !