‘ते’ दोघे लाचखोर लष्करी अधिकारी ‘मिलिटरी इंजिनिअरीग’चे


‘They’ are both corrupt military officers from ‘Military Engineering’ नाशिक : एका ठेकेदाराकडून बिलाच्या रकमेपोटी लाच स्वीकारताना मेजर हिमांशु मिश्रा आणि ज्युनिअर इंजिनिअर मिलिंद वाडिले यांना अटक झाली मात्र हे संशयीत मिलिटरी इंजिनिअर सर्व्हिसेसमध्ये (एम.ई.एस) नोकरीला होते त्यामुळे कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कुलचा या अधिकार्‍यांचा काहीही संबंध नसल्याची माहिती पुणे येथील संरक्षण विभागाच्या जनसंपर्क अधिकारी कार्यालयाने दिली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिकच्या पथकाने (सीबीआय) गुरुवारी या अधिकार्‍यांना अटक केली होती.

संशयीत न्यायालयीन कोठडीत
एका ठेकेदाराकडून बिलाच्या रकमेपोटी संशयित मिश्रा याने तक्रारदार ठेकेदाराकडून 53 हजार ता वाडिले याने 63 हजार रुपयांची रक्कम स्वीकारली. या दोघांना सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ एम.ई.एसच्या इमारतीजवळ ताब्यात घेतले. कॅट्सच्या आवारातच ही इमारत आहे. दरम्यान, सीबीआयकडून कारवाईबाबतची माहिती देण्यात आली होती. दोघा संशयितांना सापळा कारवाई करणार्‍या पथकाने शुक्रवारीन्यायालयापुढे हजर केले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान, या दोघांना मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !