भुसावळातील सुरभी नगरात बंद घर फोडले : 30 हजारांचा ऐवज लांबवला
भुसावळात चोरटे सैराट : वाढत्या चोर्यांमुळे नागरीकांमध्ये पसरली भीती
A Closed house was broken into in Surabhi Nagar in Bhusawal : Compensation Of 30 Thousand Was Extended भुसावळ : शहरातील सुरभी नगर भागातील बंद घराला चोरट्यांनी टार्गेट करीत 30 हजार चारशे रुपयांचा ऐवज भरदिवसा लांबवल्याने खळबळ उडाली. 18 रोजी सकाळी 11.30 ते रात्री 10.23 दरम्यान घडलेल्या चोरी प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सण-उत्सवाचे दिवस असल्याने नागरीकांनी बाहेरगावी जाताना नजीकच्या पोलिस ठाण्याला सूचित करावे तसेच घरातील मौल्यवान दागिने व जास्तीची रोकड बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
बंद घर चोरट्यांना पर्वणी
भुसावळ शहरातील सुरभी नगरातील समृद्धी पार्कमधील बी बिंगमधील प्लॉट क्रमांक आठमध्ये विजय सुरेश गोरे (58) हे कुटुंबासह राहतात. मंगळवारी कामानिमित्त ते बाहेर गेल्यानंतर घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधली. चोरट्यांनी कपाटातील 30 हजारांची रोकड व चारशे रुपये किंमतीचा चांदीचा दिवा लांबवला. रात्री गोरे हे घरी आल्यानंतर त्यांना घरफोडी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलिसांना माहिती दिली. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक महेश चौधरी करीत आहेत.
