धक्कादायक ! : जळगावातील डॉक्टरांना शरीरसुखाची आधी ऑफर नंतर मागितली सात लाखांची खंडणी


Shocking! : Doctors in Jalgaon were first offered physical well-being and then demanded an extortion of seven lakhs जळगाव : महिलेने डॉक्टरांच्या भेटीचे व्हिडिओ बनवत ते व्हायरल करण्याची धमकी देत सात लाखांची खंडणी मागितल्याची धक्कादायक बाब उघड झाली असून या प्रकरणी आठ जणांविरोधात खंडणीसह विविध कलमान्वये जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

आधी शरीर सुखाची ऑफर नंतर मागितली खंडणी
जळगाव शहरातील रामानंद नगर परीसरातील 40 वर्षीय डॉक्टरांना आरोपी महिलेने शरीरसुखाची ऑफर दिली व भेटीचे व्हिडिटो शुटींगही काढले. या व्हिडीओ चित्रीकरणाच्या बळावर चेतन व हिरामण नावाच्या दोघांनी डॉक्टरला चापटा-बुक्क्यांनी मारहाण करत व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. प्रदीप व संदीप या दोघांच्या मदतीने सात लाख खंडणीची मागण्यात आली. सात लाख रुपये दिले तरच तुमचे मॅटर संपेल नाहीतर हे व्हिडीओ व्हायरल केले जाईल व तुमची समाजात बदनामी होईल, जीवनातून उठवून टाकण्याची धमकी देण्यात आली. या घटनेप्रकरणी एकुण आठ जणांविरुद्ध जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात चार महिला व चार पुरुष अशा एकुण आठ जणांचा समावेश आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव क्षिरसागर करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !